मुंबई: जातीबाहेर प्रेमसंबंध जुळल्याने वडिलांकडून मुलीची हत्या
प्रतिकात्मक फोटो | Image only representative purpose (Photo credit: File)

मुंबईत (Mumbai) काही दिवसांपासून हत्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. यातच जातीबाहेर संबंध जुळल्याने वडिलांनी मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. ही घटना टिटवाळा परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. ऑफिसमधील एका मुस्लीम तरुणाशी मृत तरुणीला प्रेम झाले होते. तसेच दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. हे लग्न संबधित तरुणीच्या वडिलांना मान्य नव्हते. या वादातून वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची मााहिती समोर आली आहे.

अरंविद तिवारी असे आरोपीचे नाव आहे. अरंविद हा मूळचा उत्तरप्रदेशमधील रहवासी आहे. परंतु, मुंबई येथे आपली मुलगी नोकरी करत असल्यामुळे ते दोघेही टिटवाळा परिसरात राहत होते. ज्या ठिकाणी अरंविदची मुलगी नोकरी करत होती. तेथील एका मुलासह तिचे प्रेमसंबध जुळले. तसेच दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, तो मुलगा मुस्लीम समाजाच्या असल्यामुळे अरविंदला हे लग्न मान्य नव्हते. या विषयावरुन दोघात नेहमी वाद होत असे. यातूनच अरविंद याने आपल्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले. हे देखील वाचा-कश्मीर डॉक्टरचे एका महिलेसोबत जबरदस्तीने अश्लील फोटो काढून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो टिटवाला स्थानकापासून कल्याण स्थानकापर्यंत गेला. कल्याण परिसरात पोहचल्यानंतर त्याने भिवंडीकडे जाण्यासाठी त्याने रिक्षा बोलावली. परंतु त्यावेळी सुटकेसमधून उग्र वास येत असल्याने रिक्षाचालकाने आरोपीला विचारणा केली. तेव्हा आरोपी पूर्णपणे घाबरला आणि त्याने सुटकेस रिक्षातच सोडून पळ काढला. रिक्षाचालकाने सुटकेस उघडून पाहिले तर त्यात एका मुलीचे मृतदेह होता. यानंतर रिक्षा चालकाने याची माहिती देताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.