Farmers Ulgulan Kranti Morcha : शेतकऱ्यांचा ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’ आझाद मैदानामध्ये आज धडकला. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तो मागे घेण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारद्वारा शेतकऱ्यांना तुमच्या सर्व मागण्यांची पूर्तता करू, असे लेखी आश्वासन दिले आहे. दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारत लाँगमार्च काढला होता. अधिवेशनाचा मुहूर्त साधत गुरुवारी दुपारी हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात येऊन धडकला. यावेळी शेकडो आंदोलकांनी मैदानाबाहेरच ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झाली.
Lok Sangarsh Morcha, which has led the farmers' protests at Azad Maidan, Mumbai has called off the protest after getting written assurances on their demands from Maharashtra Government. pic.twitter.com/N3PMzmjrJT
— ANI (@ANI) November 22, 2018
राज्यभरातील विविध भागातून शेतकरी बहुसंख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत.आपल्या मागन्या मान्य करा अन्यथा आपण आझाद मैदानातच ठिय्या मांडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.