Farmers' Protest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शेतकरी आंदोलन (Farmers' Protest) ट्विट टूल किट प्रकरणात (Toolkit Case)) दिल्ली पोलीस आता महाराष्ट्रातही दाखल झाले आहेत. टूल किट (Farmers' Protest tweet Toolkit Case) प्रकरणात बीड (Beed) येथील शंतनू मुळूक (Shantanu Muluk) नामक तरुणावर गंभीर आरोप आहेत. शंतनू मुळूक या तरुणाविरुद्ध दिल्ली येथे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या तरुणाचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बीड येथे आले होते. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून दिल्ली येथे गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता आहे.

कोण आहे शंतनू मुळूक?

शंतनू मुळूक हा तरुण सध्या दिल्ली येथे राहतो. मात्र, तो मुळचा बीड येथील आहे. सध्या तो गायब आहे. त्यामुळे त्याच्या शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बीड येथे पोहोचले. शंतनू याच्या वडिलांनीही दिल्ली पोलीसांनी बीडमध्ये येऊन चौकशी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शंतनू यांनी काही काळ विदेशातही शिक्षण घेतले आहे. (हेही वाचा, Greta Thunberg Toolkit Case: ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; बेंगलुरूमध्ये 21 वर्षीय क्लाइमेट अॅक्टिविस्ट दिशा रवी ला अटक)

दरम्यान, शंतनू मुळूक याच्या कुटुंबीयांनी मात्र दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारवर आरोप केला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच शंतनू याची नाहक बदनामी केली जात आहे. दिल्ली पोलीस, केंद्र सरकार हे जाणीवपूर्वक करत असल्याचेही त्याच्या कुटुंबीयांचे म्हणने आहे. दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांनी शंतनु मुळूक याच्या आई वडिलांच्या बँक खात्याची चौकशी केल्याचेही समजते आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू हे तिघे मिळून टूलकिटचा दस्ताऐवज तयार करत होते. अपप्रचार कसा करायचा याबाबत या तिघांनी एक एक मिटींग झूम अॅपद्वारे घेतली. या मीटिंगमध्ये त्यांनी षडंत्र रचलं. या षडयंत्रामध्ये पोएटिक फाऊंडेशनसुद्ध ासहभागी होती. असा दावा दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत केला होता.