शरद पवार, अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेसचे (| (Photo Credits- Facebook )

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अहमदनगर मधील पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यावेळी काँग्रेस सरकारने तीन राज्यात कर्जमाफीच्या निर्णयावर मोदींनी कर्जमाफी म्हणजे 'लॉलीपॉप' असे वादग्रस्त विधान केले होते.

देशाचे पंतप्रधानांनी कर्जमाफी दिल्यानंतर 'लॉलीपॉप' म्हणणे चुकीचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अहमदनगर मधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी वेळी मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकारकडून देशातील महत्त्वाच्या संस्थांवर हल्ला करण्यात येत आहे. तसेच आरबीआय, सीबीआय या संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे.(हेही वाचा- भाजप पक्षासोबत हातमिळवणी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार- शरद पवार यांचा इशारा)

काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पंरतु देशाचे प्रमुख हे शेतकऱ्यांबद्दल खिल्ली उडवत असल्याटी ही गंभीर बाब असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.