दुष्काळग्रस्त लातूर मध्ये शेतकर्‍याने सीताफळ लागवडी मधून कमावले वर्षाला 40 लाख रूपये
Custard Apple| PC: Pixabay.com

दुष्काळग्रस्त लातूर (Latur) मध्ये मागील 2 वर्षात शेतकर्‍यांनी सीताफळाच्या (Custard Apple) लागवडीमधून पैसे कमावले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार कमीत कमी गुंतवणूकीची गरज असलेल्या सीताफळाच्या लागवडीमधून शेतकर्‍यांनी मागील 2 वर्षात 40 लाखांची कमाई केली आहे. नुकतील जिल्हा प्रशासनाने बाळकृष्ण नामदेव येळाले या शेतकर्‍याची सकारात्मक कहाणी शेअर केली आहे.

येळाले यांची जानवळ गावामध्ये सात एकर जमिन आहे. तेथे त्यांनी सीताफळाचं पीक घेतलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीताफळापूर्वी ते आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी द्राक्षांची लागवड करत होते. काही वर्षांपूर्वी कीटकनाशकांच्या वापराचं कारण देत परदेशात द्राक्षं नाकारल्याचा प्रकार समोर आल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. पण हार न मानता त्यांनी द्राक्षाऐवजी सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला. नक्की वाचा: शेतकरी कुटुंबात यंदा मुलीचा जन्म झाल्यास सामाजिक वनीकरण विभाग देणार 10 रोपे .

लातूर मध्ये पाण्याचा अनेकदा तुटवडा जाणवतो सोबतच वातावरणातही सातत्याने चढउतार होत असतात. सीताफळाच्या लागवडीमध्ये या झाडांच्या पानांचा उग्र वास असल्याने प्राणी या फळाच्या जवळ येत नाहीत.

सीताफळाच्या लागवडीसाठी कमीत कमी पाणी आणि वर्षाकाठी 50 हजार रूपये देखभालीचा खर्च असतो. एका एकरामध्ये 5-10 टन सीताफळ येतं. मागील 2 वर्षात येळाले यांनी या सीताफळ लागवडीतून 40 लाख कमावले. सध्या त्यांच्या फळाला दिल्ली, हैदराबाद, नवी मुंबईच्या बाजरपेठेतून चांगली मागणी आहे.