PM Narendra Modi यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अन जुन्नरच्या शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळलं; 'हे' होतं कारण
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना 17 सप्टेंबर दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा एका शेतकर्‍याने महाराष्ट्रात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचं नाव दशरथ केदारी आहे. त्याच्या कुटुंबातील अरविंद वाघमारे याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंदजवळ रानमळा येथील आहे. शेततळ्यात उडी मारून दशरथने आपला जीव दिला. तो मागील 8 वर्ष शेती करत होता. हे देखील नक्की वाचा: Farmer Suicide Attempt in Beed: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणावेळी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक प्रकार.  

आत्महत्या झालेल्या दिवशी दशरथ उदास वाटत होता पण त्याने पंतप्रधानांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. काही वेळातच त्याने शेततळ्यातील पाण्यात उडी मारून जीव दिला. त्याची सुसाईड नोट देखील सापडली आहे.

सुसाईड नोट मध्ये दशरथने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहे. तसंच आत्महत्येचं कारण देताना, पिकाला हमी भाव नाही, देणेकर्‍यांचे पैसे थकल्याने आत्महत्या करत असल्याचं नमूद केले आहे.

दशरथ याच्या आत्महत्येनंतर शिवसेनेने आक्रमक होत राज्य सरकार शेतकर्‍यांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत टीकास्त्र डागत आहेत. 'शेतकरी पंतप्रधानांना शुभेच्छा देऊन 'चितेवर' जात आहेत आणि पंतप्रधान 'चित्ते' पाहण्यात दंग आहेत अशी टीपण्णी शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.

शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांनी या आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाची दखल घ्यावी असे आवाहन केले आहे. पुढील आठवड्यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री निर्मला सीतारमण पुणे दौर्‍यावर आहेत तेव्हा त्यांनी दशरथच्या कुटुंबाची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दशरथ केदारी हे 42 वर्षीय होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहे. दोन्ही मुलं कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांची मुलगी श्रावणी 18 वर्षीय आहे तर मुलगा शुभम 20 वषीय आहे.

दशरथ यांच्या आत्महत्या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.