Namdeo Dhondo Mahanor Passes Away: ना. धो. महानोर यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाठिमागील काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना किडणीचा त्रास होता. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वाला धक्का बसला आहे. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असे. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. मराठी कवीता आणि गीते यांमध्ये येणारे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले. खास करुन नामदेव धोंडो महानोर असे पूर्ण नाव असलेला हा कवी खरा प्रगतीशील शेतकरी म्हणूनही ओळखला जात असे.
मराठी साहित्यातील रानकवी, ना. धो महानोर
ना धो महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळसखेड येथे 16 सप्टेंबर 1942 मध्ये झाला. ते प्रसिद्ध कवी आणि गीतकार आहेत. शिवाय महाराष्ट्र विधानपरिषदेचे ते माजी आमदार आहेत. निसर्गात रमणारा कवी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कवीतांमध्ये खास करुन बोलीभाषांचा वापर केला. त्यांनी विविध वृत्तपत्रांसाठी लेखही लिहीले. शिवाय इतरही साहित्यप्रकार त्यांनी लिलया हाताळले. इतकेच नव्हे तर जाहिरातींसाठी त्यांनी जिंगल्स लिखानही केले.महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. (हेही वाचा, Nitin Desai Suicide: बॉलीवूड कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या प्राथमिक पोस्टमॉर्टचा अहवाल समोर, फाशीमुळे मृत्यू झाल्याचे आले समोर)
महानोर यांची पुस्तके
कवितासंग्रह- अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ,जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पक्षांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता , गपसप (कथासंग्रह) गावातल्या गोष्टी (कथासंग्रह), पळसखेडची गाणी (लोकगीते), पु. ल. देशपांडे आणि मी, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण आणि मी, शरद पवार आणि मी (व्यक्तीचित्रण), या शेताने लळा लाविला, शेती, आत्मनाश व संजीवन, कापूस खोडवा (शेतीविषयक)
महानोरांची गीते असलेले चित्रपट
ना धो महानोर यांनी चित्रपटांसाठी लिहीलेली गीतेही विशेष गाजली यामध्ये एक होता विदूषक चित्रपटातील, जाळीमधी झोंबतोया गारवा, तुम्ही जाऊ नका हो रामा, सूर्यनारायणा नित् नेमाने उगवा या गीतांचा उल्लेख करावा लागेल. खास करुन लावणी या साहित्यप्रकारात त्यांनी चित्रपटासाठी लिहीलेली 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही लावणी प्रचंड गाजली. श्रावणातील उन्ह आणि स्त्रीच्या मनातील उल्लड भावना त्यांनी या लावणीत शब्दबद्ध केली आहे. मधल्या काळात 'दूरच्या रानात केळीच्या बनात' हे त्यांचे गीत प्रचंड गाजले होते. याशिवाय त्यांनी अबोली, एक होता विदूषक , जैत रे जैत, दूरच्या रानात केळीच्या बनात (आल्बम), दोघी, मुक्ता, सर्जा, मालक, ऊरुस, अजिंठा, यशवंतराव चव्हाण या चित्रपटांसाठी गीतलेखन केले.