औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थकांनी काही दिवसांपूर्वी एक आंदोलन केले होते. हे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाला प्रोत्साहन देणारे काकासाहेब शिंदे यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते. तर काकासाहेब यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारकडून करण्यात येणाऱ्या निष्काळजीपणामुळे आत्महत्या केली होती. भाजप सरकारची सत्ता होती आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळत असताना ही घटना घडली होती. संपूर्ण राज्यात झालेल्या या आंदोलनामुळे सर्वांचीच झोप उडाली होती. त्यामुळे अखेर सरकारला मराठा समाजाला आरक्षण देणे भाग पडले.
मराठा क्रांती मूक मोर्चावेळी जवळजवळ 42 लोकांनी आत्महत्या केली होती. या सर्वांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून हे टोकाचे पाऊल उचलले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाने या 42 जणांच्या परिवाराला सरकारकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी केली होती. याच दरम्यान आता मराठा आरक्षण लढ्यात ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे.(Maratha Reservation: मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी आता 15 जुलैला; सर्वोच्च न्यायालय देणार अंतरिम आदेश)
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला आत्ताच माहिती दिली की, मराठा आरक्षण लढ्यात ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नौकरी व आर्थिक मदत करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला.
याबद्दल @AjitPawarSpeaks दादा, @mieknathshinde साहेब व सर्व मंत्रिमंडळाचे आभार
— Vinod Patil (@vnpatilofficial) August 12, 2020
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी हे आंदोलन औरंगाबाद मधील कायगाव टोक परिसरात करण्याचे ठरवले होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नाही, आंदोलक कायगाव टोक येथून आंदोलन करण्यासाठी निघाले सुद्धा होते. परंतु पोलिसांनी त्यांना गंगापुर फाटा येथेच रोखले होते.