Fact Check of Nitesh Rane & Uday Samant Tweet: महाप्रबोधन यात्रा सभेला तुफान गर्दी; नितेश राणे, उदय सामंत यांच्यासह भाजप, शिंदे गटाचे पडले नेते तोंडघशी
Maha Prabodhan Yatra (Photo Credit - Twitter)

शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या महाप्रबोधन यात्रेची (Maha Prabodhan Yatra) बीड (Beed जिल्ह्यात सांगता झाली. या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोशल मीडियाव अनेक दावे केले होते. या सभेला लोक जमले नाहीत. सभा फ्लॉप झाली. लोकांनी पाठ फिरवली अशा अनेक प्रतिक्रिया देत फोटोही ट्विट करण्यात आले होते. त्यातच या सभेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut), चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), यांच्यासारखे बडे नेते उपस्थित राहणार असल्याने उत्सुकता वाढली होती. दरम्यान, सभा सुरु होताच मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आणि तथ्यपडताळणी केली. या तथ्यपडताळणीत लक्षात आले की, नितेश राणे आणि उदय सामंत यांनी केलेले दावे निकालस खोटे आणि तोंडघशी पडणारे आहेत. शिवसेना (UBT) पक्षाच्या सभेला मोठी गर्दी होती, असे आढळून आले.

सत्ताधाऱ्यांकडून सुषमा अंधारे यांच्या बीड येथील सभेला विशेष लक्ष करण्यात आले होते. बीड हे सुषमा अंधारे यांचे होमपीच मानले जाते. त्यामुळे त्यांच्या होम पीचवरच महाप्रबोधन यात्रेची सांगता होत असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे या सभेकडे लक्ष लागले होते. अशा वेळी सांगता सभेत सुषमा अंधारे यांच्यासह शिवसेना (UBT) पक्षाचे नेते काय बोलतात आणि त्याला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (हेही वाचा, आदित्य ठाकरे यांचे सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान)

ट्विट

दरम्यान, उदय सामंत आणि नितेश राणे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट केले होते. ज्यात सभेच्या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसत होते. नितेश राणे यांनी सभास्थळावरील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो ट्विट करत 'शकुनीमामा चा बीड मध्ये FLOP शो !! महा प्रबोधन म्हणे' असे म्हणत खोचक टीका केली होती. तसेच, खिल्ली उडवणारा इमोजीही वापरला होता. दुसऱ्या बाजूला मंत्री उदय सामंत यांनी 'महा प्रबोधन सभा बीड... प्रचंड गर्दी... शुभेच्छा..' असे म्हणत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो टाकत सभेची खिल्ली उडवली होती.

ट्विट

ट्विट

दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या सांगता सभेला सुरुवात झाली आणि उदय सामंत, नितेश राणे यांनी केलेले सर्व दावे गळून पडले. सभेला अपेक्षेपेक्षाही अधिक गर्दी होती. सभास्थळी दूरदूरपर्यंत एकही खुर्ची रिकामी नव्हती. सर्वत्र खचाखच गर्दी पाहायला मिळत होती. या सभेचे आणि गर्दीचे व्हिडिओही आता पुढे आले आहेत. जे व्हायरलही होत आहेत. त्यामुळे उदय सामंत आणि नितेश राणे यांनी केलेले दावे फोल असून त्यात तथ्य नसल्याचे पुढे आल्याचे आमच्या तथ्यपडताळणीत पाहायला मिळले.