फेसबुकवर मैत्री (Facebook Friend) करून तिला महाराष्ट्रात बोलावून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शाहपूर पोलिसांनी आरोपीला दोन वर्षांनी लातूरमध्ये पकडले आणि नंतर त्याला रिमांडवर घेऊन सोमवारी गोरखपूरला आणले. आरोपी पूर्वी गोरखपूर येथे राहत होता. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
दस्तगीर शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औरद शहाजानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहपूरच्या पडरी बाजार येथे राहणारी 11 वर्षीय मुलगी 24 डिसेंबर 2021 रोजी घरातून बेपत्ता झाली होती. (हेही वाचा, Complaints Through Social Media: आता सोशल मिडियाद्वारे केलेल्या तक्रारींची होणार तत्काळ कार्यवाही; CM Ekanth Shinde यांनी प्रशासनाला दिले निर्देश)
मुलगी बेपत्ता होताच कुटुंबीयांनी तिच्या खोलीचा शोध घेतला. तिच्या खोलीत दोन मोबाईल क्रमांक सापडले. या मोबाईल क्रमांकावर तिच्या वडीलांनी संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने फोन स्वीकारला. सदर व्यक्तीने मुलीच्या वडिलांना सांगितले की, आपण हैदराबादचे शेख आहोत. तुमची मुलगी माझ्यासोबत आहे आणि ती आता कधीच परत येणार नाही. तिला विसरून जा. त्यानंतर त्याने पीडितेच्या वडिलांना धमकीही दिली. या प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. ज्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस वडिलांकडून प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकावर पाळत ठेऊन होते. अखेर एक दिवस या फोनचा पोलिसांना छडा लागला आणि पोलीस लातूर येथे पोहोचले. पोलिसांनी दस्तगीर शेख याला अटक केली. त्याला ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पोलीस गोरखपूरला आले. चौकशीत आरोपीने तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्ह्यातील कलमे वाढवली. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायदा आणि बलात्काराच्या कलमात वाढ केली . शाहपूरचे प्रभारी निरीक्षक मनोज पांडे यांनी सांगितले की, तरुण पूर्वी गोरखपूरमध्ये राहत होता. यादरम्यान फेसबुकच्या माध्यमातून त्याची अल्पवयीन मुलाशी मैत्री झाली. तिला आमिष दाखवून महाराष्ट्रात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी आधीच बाहेर आली होती, आरोपी फरार होता. शाहपूर पोलिसांनी फरार आरोपीला लातूर येथून अटक केली.
.