BEST bus (Photo Credits: PTI)

मुस्लिम बांधवांच्या महत्त्वपूर्ण मानला जाणारा 'रमझान ईद'(Ramadan Eid) हा सण आज सर्वत्र मोठ्या जल्लोषात, आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मुस्लिम बांधव आज आपल्या आप्तलगांना भेटतील, घराबाहेर पडतील. त्यामुळे अशा वेळी त्यांच्या या आनंदामध्ये कोणतेही विरजण पडू नये, तो उत्साह कुठे खंडित होऊ नये म्हणून आज बेस्टतर्फे 131 जादा बसेस सोडण्यात येतायत. या बसेस कोणत्या ते पाहूयात.

बसमार्ग क्रमांक 3, 4 मर्या., 7 मर्या. ,8 मर्या., 21 मर्या., 22 मर्या., 28, 30 मर्या., 33, 37, 45, सी-71 जलद, 77, 85, 86, 87 मर्या. ,88, 108, 111, 124, 125, 134, 180 बसमार्गांचा त्यात समावेश आहे. त्यासह, 203, 211, 224, 231, 241, 256, 269, 271, 272, 302, 305, 326, 355मर्या., 356, 376, 396 मर्या., 403, 408, 422, 496 मर्या., 501 मर्या., 521 मर्या., 524 मर्या., 533 मर्या.,545 मर्या.,706 मर्या.,718 मर्या.,आदी मार्गावर एकूण 131 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

Happy Eid Mubarak 2019: जगभरातील 'या' 5 प्रसिद्ध 'मस्जिद' बद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी

या बसगाड्या दुपारी २ वाजल्यानंतर चालविण्यात येतील. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्थादेखील केली आहे. बेस्टची ही विशेष सेवा आज खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. आणि रमजान ईदचा आनंद अजून द्विगुणित करण्यास मदत करेल असे म्हणता येईल.