देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; गुन्हे लपवल्याच्या खटल्यातील पुनर्विचार याचिकेवर आता ओपन कोर्टात होणार सुनावणी
Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

भाजप नेते (BJP) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकी (Maharashtra Assembly Election 2014) दरम्यान स्वत:वर दाखल असलेल्या गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात फडणवीस यांनी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती ज्यावर सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court)  समाधानकारक प्रतिसाद आल्याने आता फडणवीस यांना दिलासा मिळाला आहे. फडणवीस यांच्या याचिकेनुसार या खटल्यातील पुढील सुनावणी ही ओपन कोर्टात घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती, कोर्टाने ही विनंती मान्य केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 रोजी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील दोन गुन्हे लपवले होते, असा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं त्यांच्याविरोधात खटला चालवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायलायच्या नागपूर खंडपीठाला दिले होते. त्यानंतर फडणवीस यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ओपन कोर्टात सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली होती.

ANI ट्वीट

फडणवीस यांनी गुन्हे लपवल्याची तक्रार अॅड. सतीश उके यांच्यातर्फे करण्यात आली होती. यापैकी एक गुन्हा हा मानहानीचा होता तर एक गुन्हा फसवणुकीचा होता. याचिकेत सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरताना फडणवीस यांनी हे गुन्हे लपवल्याचा आरोप उके यांनी केला होता.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यालयाकडून फडणवीस यांच्या याचिकेचा विचार करून यापुढील सुनावणी ओपन कोर्टात घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. या सुणवणीची तारीख मात्र कोर्टाने अद्याप सांगितलेली नाही.