रियाधहून बंगळूला जाणाऱ्या इथिओपियन एअरलाईन्स कार्गो विमानाने (Ethiopian Airlines Cargo Flight) आज मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) एमर्जंसी लॅन्डिंग (Emergency Landing) केले आहे. या घटनेने मुंबई विमानतळावर भितीचे वातावरण पसरले होते. विमानाच्या समोरच्या चाकातून मोठ्या प्रमाणात तेलगळती होत असल्याने विमान तातडीने मुंबईकडे वळविण्यात आले. या विमानात क्रूचे आठ सदस्य होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजत आहे. या घटनेची माहिती होताच मुंबई अग्निशमन दल, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी पथक विमानाची तपासणी करत आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इथिओपिअन कार्गो विमान रियाधहून बेंगळुरू येथे जात होते. दरम्यान, विमानाच्या समोरच्या चाकातून मोठ्या प्रमाणात तेलगळती होत लागली. दुर्घटनेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन हे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एमर्जंसी लॅन्ड करण्यात आले. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने तीन बंब, दोन बचाव वाहने व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, विमान लॅन्ड केल्यानंतर कोणतीही जिवीतहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सहा सदस्यांसह विमान सुखरुप खाली उतरविण्यात आले असून स्थिती नियंत्रणात असल्याचे माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Mumbai Police: डोनाल्ड ट्रम्प, जो बिडेन आकडा बदलू शकतात पण, मुंबई पोलीस कधीच नाही सुरक्षेसाठी नेहमीच संपर्क करा 100 या क्रमांकावर
एएनआयचे ट्वीट-
Full Emergency was declared for freighter flight ET690 Ethiopian airlines from Riyadh to Bengaluru & was diverted to Mumbai due to hydraulic leakage. Aircraft landed safely: Mumbai International Airport Limited (MIAL) Spokesperson https://t.co/2tjeaey9IG
— ANI (@ANI) November 8, 2020
या घटनेनंतर मुंबई विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. तसेच या विमानाच्या समोरच्या चाकातून तेलगळती कशामुळे झाली? याचा तपास केला जात आहे. यासाठी तांत्रिक आणि अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.