Mumbai Police: डोनाल्ड ट्रम्प, जो बिडेन आकडा बदलू शकतात पण, मुंबई पोलीस कधीच नाही सुरक्षेसाठी नेहमीच संपर्क करा 100 या क्रमांकावर
(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलीस (Mumbai Police,) सोशल मीडियावर आपल्या हटके ट्विटसाठी ओळखले जातात. कोरोना व्हायरस असो वा इतर कोणत्याही बाबतीतली जनजागृती मुंबई पोलीस सोशल मीडियावर आपला हटके अंदाज दाखवून देतात. विद्यमान घटना, घडामोडी यांचा आधार घेत मुंबई पोलीस लक्ष्यवेधी पद्धतीने जनजागृती करतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक मतमोजणीचा आधार घेत मुंबई पोलिसांनीही असेच हटके ट्विट करत संदेश दिला आहे. या ट्विटमधून मुंबई पोलिसांनी मदतीसाठी 100 क्रमांकावर ( Mumbai Police Helpline Number) फोन करुन संपर्क साधण्याचे अवाहन केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. अद्यापही मतमोजणी सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले डेमोक्रेट्स (Democratic Party) पक्षाचे उमेदवार जो बिडेन (Joe Biden) आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन (Republican Party) पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात काट्याची टक्कर सुरु आहे. बिडेन हे 264 तर ट्रम्प 214 मतांवर अटकले आहेत. केले काही तास दोघेही याच आकड्यावर थांबून आहेत. अशा स्थितीत सुरु असलेल्या मतमोजणीनंतर हे आकडे बदलू शकतात. याचाच अधार घेत मुंबई पोलिसांनी नागरिकांना सुरक्षेबाबत संदेश दिला आहे. (हेही वाचा, Well Done Mumbai Police: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्विटरवर ‘वेल डन मुंबई पोलीस’ ट्रेंड सुरु)

मुंबई पोलिसांनी डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्या विद्यमान मतसंख्येचा आकडा ट्विट करत मिश्किलपणे म्हटले आहे की, 'डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांचेही क्रमांक बदलू शकतात. परंतू, मुंबई पोलिसांचा नाही'. दरम्यान, आपण केव्हाही मदत घेण्यासाठी, माहिती देण्यासाठी 100 हा क्रमांक वापरु शकता. कारण हा क्रमांक कधीच बदलत नाही, असेही पोलीस सूचवू पाहात आहेत.