येस बँकेचे संस्थापक राणा कपूर (YesBank Founder Rana Kapoor) यांना 30 तासांच्या चौकशीनंतर अटक (Arrests) करण्यात आली आहे. आज पहाटे 4 वाजता अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडशी (डीएचएफएल) निगडीत मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटक केली आहे.
राणा कपूर यांची शनिवारी मध्यरात्रीपासून चौकशी करण्यात आली. त्यानंतर तब्बल 30 तासांनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आज 11 वाजता राणा कपूर यांना प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट कोर्टात म्हणजेच पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (हेही वाचा - Yes Bank Crisis: येस बॅंकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा! आता एटीम मधून पैसे काढता येणार असल्याची दिली माहिती)
Mumbai: Enforcement Directorate (ED) arrests #YesBank founder #RanaKapoor. Visuals from ED office where he was being questioned. pic.twitter.com/K7GSr7gCl1
— ANI (@ANI) March 7, 2020
राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू यांचीही याप्रकरणी चौकशी केली आहे. कपूर यांच्यावर डीएचएफएल आणि यूपी पॉवर कॉर्पोरेशनला कर्ज देत फायदा मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. राणा कपूर यांच्या विरोधात ईडीने लूक आउट नोटीसही जारी केली आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही.
दरम्यान, येस बॅंकेतील ग्राहकांना आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार येस बँकेचे खातेदार महिनाभरात एकदाच 50 हजारांपर्यंत रक्कम काढू शकतात.