औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना बंडखोर देवयानी डोणगावकर, काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांना समान मत; आता अशी होणार अध्यक्षांची निवड
Congress, Shiv Sena | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. नाशिक, कोल्हापूर, जळगाव, सांगली येथील निकाल लागल्यानंतर नुकताच औरंगाबाद येथील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर देवयानी डोणगावकर (Devyani Donegaonkar) आणि काँग्रेसच्या मीनाताई शेळके (Minatai Shelke) महाराष्ट्र, औरंगाबाद, औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूक, दोघांनाही समान मत पडल्याने अध्यक्ष कोणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. दोन्ही उमेदवारांना समान मत पडल्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड तहकूब करण्यात आली आहे. तसेच उद्या 4 जानेवारी दुपारी 2 वाजता चिठ्ठी टाकून किंवा टॉस करुन अध्यक्षांची निवड होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजप- शिवसेना महायुतीने एकत्र लढवली होती. परंतु, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेना पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत अधिक जागा मिळूनही भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपची नामुष्की होत आहे. एवढेच नव्हेतर याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणूकीतही दिसू लागला आहे. नाशिक, कोल्हापूर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीचे सरकार आल्याने भाजपची घसरण सुरु झाल्याचे पडसाद उमटू लागले आहे. सध्या औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला असून शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर आणि काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांना 29 / 29 मत पडली आहेत. आता ही निवड उद्या 4 जानेवारी दुपारी 2 वाजता नव्याने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. हे देखील वाचा-शिवभोजन योजना राज्यभरात 26 जानेवारीपासून होणार सुरु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनास निर्देश

सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 सदस्य भाजपकडे, शिवसेना 18, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 3, मनसे 1, डेमोक्राटीक 1 असे पक्षीय बलाबल आहे. गेल्यावेळी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची मदत घेत आपला अध्यक्ष केला होता. त्यानंतर आता अध्यक्षपदावर दावा सांगत शिवसेनेला दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिली आहे.