निवडणूक आयोगाने (Election Commission) 2019-20 या आर्थिक वर्षात देशभरातील राजकीय पक्षांना मिळालेल्या पक्षनिधीबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा निधी (Party Funds) मिळवणारा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ही आकडेवारी केवळ धक्कादायकच नव्हे तर हातात सत्ता असेल तर त्याचा पक्षनिधी वाढीसाठी कसा फायदा होतो हे दाखवणारीही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या वर्षभरात मिळालेला पक्षनिधी तब्बल पाच पटींनी वाढला आहे. विशेष म्हणजे हा निधी राज्यात महाविकासआघाडी सत्तेवर आल्यानंतरचा आहे. दुसऱ्या बाजूला मायावती यांच्या बहुजन समाजवादी पक्षाला मात्र वर्षभरात 20 हजारांच्या पुढे पक्षनिधी जमवता आला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निधी देणारे प्रमुख देणगीदार
- बीजी शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्राइवेट लिमिटेड- 25 कोटी रुपये
- पंचशील कॉरपोरेट पार्क- 7.5 कोटी रुपये
- पंचशील कॉरपोरेट पार्क - 7.5 कोटी रुपये
- सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया- 3 कोटी रुपये
- फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड- 1.2 कोटी रुपये
- हार्मनी इलेक्टोरल ट्रस्ट- 1.5 कोटी रुपये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच भाजपा, काँग्रेस, सीपीआई, सीपीएम आणि तृणमूल कांग्रेस आदी पक्षांच्या नीधीचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नाही. तसेच, काही प्रादेशीक पक्षांच्या निधीचा आकडाही संकेतस्थळांवर उपलब्ध नाही. त्यामुळे महाविकाआघाडी सरकारचा प्रमुख घटक पक्ष शिवसेना पक्ष निधीबाबत आकडा उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, एआईएडीएमके 20 हजार रुपयांच्या वर निधी मिळाला आहे. सांगितले जात आहे की एआईएडीएमके पक्षाला 46.8 कोटी रुपये निधी टाटा ग्रुप संचलित प्रोग्रेसिव इलेक्टोरल ट्रस्ट द्वारा देण्यात आला आहे. हा निधी पक्षाच्या एकूण निधीच्या 94% इतका आहे. एआईएडीएमके च्या विरोधात असलेला पक्ष डीएमकेला 48.3% निधी मिळाला आहे. यात 45.5 कोटी रुपये म्हणजेच 93% निधी इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून मिळाला आहे. (हेही वाचा, Aurangabad: औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे मोठे वक्तव्य)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशातील बीजू जनता दलालाही 25.6 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधीही टाटा ग्रुपच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टने 2019-20 या कालावधीत दिला आहे. त्या आधी 2018-19 मध्ये एआईएडीएमके आणि बीजदला एकूण 72 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. बिहारमध्ये भाजपचा सहकारी नितीश कुमार यांच्या जदयूला 20 हजार रुपयांपेक्षा वर 6 कोटी रुपये मिळाले आहेत. यात 1.2 कोटी रुपये (20%) इलेक्टोरल ट्रस्ट द्वारा देण्यात आले आहेत. याशिवाय शिरोमणि अकाली दल, लोजपा यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तेलगू देसम पार्टीला 1 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.