महाराष्ट्रात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता शिथिल
Election Commission (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रामध्ये सध्या 151 गावांमध्ये सरकारने दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. मात्र लोकसभा निवडणूक 2019  (Lok Sabha Elections)ची आचारसंहिता (Model Code of Conduct) असल्याने अनेक ठिकाणी अपेक्षित मदत सरकार करू शकत नाही. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मान्य केली होती. अखेर त्याला मान्यता देण्यात आली आहे.

ANI Tweet:  

दुष्काळग्रस्त भागामध्ये विहीर खोदणे, पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनॉलची दुरूस्ती इत्यादी कामं हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठ्याची सोय करून दिली जाणार आहे.

महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. 23 मे दिवशी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे ही शिथिलता देण्यात आली आहे.