Abhijit Bichukale (Photo Credits: Facebook/ Abhijit Bichukale)

बिग बॉस मराठी 2 फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale)  यांना आज (10 ऑक्टोबर) निवडणूक आयोगाकडून दणका मिळाला आहे. मुंबई येथील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिजीत बिचुकले यांनी दैनंदिन प्रचाराचा हिशोब आयोगाला न दिल्याने त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत वरळी विधानसभा मतदारसंघात (Worli Vidhan Sabha Constituency) अभिजीत बिचुकले यांच्यासोबत विश्राम तिडा पाडम आणि महेश पोपट खांडेकर या उमेदवारांनाही निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: अभिजित बिचुकले देणार आदित्य ठाकरे यांना आव्हान; वरळी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून भरणार उमेदवारी अर्ज

अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत सहभागी झाले आहेत. मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तर सातार्‍यात शिवेंद्र राजे यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. मुंबईत अभिजीत बिचुकले यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र दैनिक खर्चात दिवसभरात होणारा खर्च, वह्यांची नोंद आदी खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. Maharashtra Assembly Election 2019: अभिजित बिचुकले यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी तीनपट श्रीमंत; पहा किती आहे बिचुकले दांपत्याची एकूण संपत्ती

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी पार पडणार आहे.