शिंदे गटाच्या बंडानंतर खरी शिवसेना (Shiv Sena) नेमकी कुणाची हा वाद अजूनही सर्वोच्च न्यायालयासह (Supreme Court) निवडणुक आयोगात (Election Commission) सुरु आहे. दोन्ही गटास आपापल्या बाजू मांडण्यास निवडणुक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. तरी आमची शिवसेना हीच खरी हे सिध्द करण्यासाठी ठाकरे गटाकडून (Thackeray Group) निवडणुक आयोगापुढे नुकतेचं प्रतिज्ञपत्र सादर करण्यात आले आहेत. तरी त्यापैकी अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणुक आयोगाकडून बाद करण्यात आली आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे गटाला (Udhhav Thackeray Group) पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. अंधेरी पोट निवडणुकीत (Andheri By Election) जवळपास ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय होणार असला तरी पक्षाची, शिवसेना (Shiv Sena) या नावाची आणि पक्षचिन्हाची मोठी अडचण ठाकरे गटापूढे आहे.
ठाकरे गटाच्या (Thackera Group) प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती प्रतिज्ञपत्र चुकीची असल्याचे निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने जो काही मजकूर ठरवून दिला होता त्या प्रमाणे न दिल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. हे नियम पाळण्यात न आल्यानेच ही प्रतिज्ञापत्रं नाकारण्यात आली आहेत. दरम्यान उर्वरित साडे आठ लाख प्रतिज्ञापत्रं स्वीकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (हे ही वाचा:- CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामल्लाचं दर्शन घेणार, पुढील महिन्यात आमदारांसह करणार अयोध्या दौरा)
सध्या ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले आहे. तसेच या दोन्ही गटांना वेगवेगळी पक्षचिन्ह देण्यात आली आहेत. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटास ढाल तलवार हे पक्षचिन्ह देण्यात आलं आहे. तरी हे कायमस्वरुपी फैसला नसुन तात्पूर्ता देण्यात आलेलं चिन्ह आणि नाव आहे. शिंदे विरुध्द ठाकरे या वादाचा फायनल फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.