राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढील महिन्यात गटातील आमदारांसह अयोध्या (Ayodhya) दौरा करणार आहेत. रामलल्ला चरणी नतमस्तक होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. हल्ली अयोध्या हे धार्मिक स्थाळाप्रमाणेच राजकीय नेत्यांचं आवडतं ट्रॅव्हल डेस्टीनेशन (Travel Destination) झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) नुकताच अयोध्या दौरा केला आहे. गेले काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील अयोध्या दौरा करणार होते पण त्यांच्या आजारपणामुळे तो रद्द करण्यात आला. तरी सत्तास्थापणे नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) हा पहिलाचं अयोध्या दौरा असणार आहे म्हणून या दौऱ्यास विशेष राजकीय महत्व आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्याबाबची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीनंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये हा दौरा होणार आहे. तिथे जाऊन शिंदे रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी शिंदे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी गेल्या वेळी बंड पुकारण्यापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकां दरम्यान अयोध्या दौरा केला होता तरी आता मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळल्यानंतर एकनाथ शिंदे पहिलाचं अयोध्या दौरा करणार आहे. (हे ही वाचा:- Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी प्रदीप भालेकर नावाच्या व्यक्तीविरोधात FIR दाखल)
एवढचं नाही तर या दौऱ्यात गटातील काही महत्वाचे आमदार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत असणार आहेत. तरी हा दौरा फक्त शिंदे गटाचा असेल की या दौऱ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या दौऱ्यात सहभागी होणार याबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आहे म्हणून देवेंद्र फडणवीस या दौऱ्यात हजेरी लावणार का याबाबत चर्चा होत आहे.