Ekvira Chitri Yatra 2022: एकविरा गडावर चैत्री यात्रा दरम्यान कलम 144 लागू; भाविकांना दर्शनासाठी नसेल बंदी
Ekvira | PC: Instagram

पुण्यात चैत्र नवरात्र (Chaitra Navaratr) दरम्यान एकविरा गडावर 7-10 एप्रिल दरम्यान चैत्री यात्रा (Chaitri Yatra) पार पडणार आहे. महाराष्ट्र सरकारने नागरिकांना कोविडच्या नियमावलीतून निर्बंधमुक्त केल्यानंतर आता तब्बल 2 वर्षांनी ही यात्रा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाणार आहे. मात्र अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे जिल्हाधिकार्‍यांनी कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू केली आहे. या जमावाबंदीच्या आदेशामुळे भाविक दर्शनासाठी जाऊ शकणार की नाहीत असा प्रश्न काहींच्या मनात आला आहे. पण या कलमानुसार भाविकांना प्रवेशबंदी नसेल.

कोळी,आगरी बांधवांसाठी ही चैत्री यात्रा महत्त्वाची असते. या यात्रेदरम्यान गडावर यंदा दारुबंदी आणि पशुहत्या करण्यास बंदी असणार आहे. यात्रेचं औचित्य साधत अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी, नवस फेडण्यासाठी येतात. हजारो पालख्या, दिंड्या परंपरेनुसार कोकणातून कार्ल्याला पायी आणल्या जातात . देवीच्या पालखी सोहळ्यास लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते.

प्रशासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, यात्रेदरम्यान शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके फोडणे निषिद्ध असेल. एकाच प्रकारचे, रंगाचे कपडे घालून गोंधळ घालणे, शिवीगाळ करणे, अर्वाच्च भाषेत बोलणे, एकमेकांत अथवा ग्रुपमध्ये भांडणे करणे टाळा. कार्ला लेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तु व शिल्पांना हानी पोहचविणे किंवा विद्रुपीकरण करणे टाळा. Ram Navami 2022 Date: राम नवमी यंदा 10 एप्रिल दिवशी; जाणून घ्या राम जन्म, पूजेची वेळ काय? 

एकविरेच्या यात्रा काळात वेहेरगाव, कार्ला, मळवली, वाकसई, वरसोली, देवघर आदी परिसरात दारुविक्रीस बंदी घालण्यात आली आहे.