Maharashtra Political Crisis: शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेच्या गटाचं नाव ठरल! 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे', दीपक केसरकर यांची माहिती
Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात आता शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला नवा गट स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 'शिवसेना - बाळासाहेब ठाकरे' (ShivSena - Balasaheb Thackeray) यांच्या नावाने आपला नवा गट स्थापन करण्यात आला आहे. अशी माहिती बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ANI ला दिली आहे. सर्व बंडखोर आमदारांच्या मदतीने ही तयारी सुरू आहे. दरम्यान, शिंदे यांचा नवा गट स्थापन झाल्याची बाब समोर आली. मात्र, नियमानुसार आधी वेगळा गट ओळखणे आवश्यक आहे. त्यानंतर पक्षाचे नाव आणि ओळखीसाठी निवडणूक आयोगाकडे जावे लागेल. हे सर्व केल्यानंतरच नवा पक्ष स्थापन होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.

Tweet

तर शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनीकांनी दिली आहे. बाळासाहेबांचं नाव वापरुन सहानुभूती दाखवायची गरज नाही. त्यांना हे नाव वापरण्याचा अधिकार नाही. आम्हाला पक्षप्रमुखांनी आदेश दिले नाहीत म्हणून आम्ही शांत आहोत, अशा भावना शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.  शिंदे यांनी यापूर्वीच दावा केला आहे की त्यांना 50 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे, त्यापैकी 38 शिवसेनेचे आहेत. (हे देखील वाचा: Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा गुंडगिरी संपवा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती - नवनीत राणा)

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही निष्पन्न झाले नाही. यानंतर शिवसेनेचे प्रयत्न पक्ष वाचवण्यासाठी वळले आहेत. कारण फ्लोर टेस्ट होताच सरकार पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पक्ष वाचवण्यासाठी शिवसेना आता बंडखोरांवर कारवाई करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी उपसभापतींकडे तक्रार करून बंडखोर आमदारांना नोटिसा पाठवण्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच बंडखोर आमदारांना त्यांच्या वतीने अल्टिमेटम दिला आहे. ज्यात त्यांनी 24 तासांत परत येण्याचे सांगितले होते.