Eknath Khadse | (File Photo)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) रूग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार एकनाथ खडसे यांना युरिन इंफेक्शनचा (Urine Infection) त्रास होत असल्याने त्यांना मुंबई (Mumbai) मध्ये बॉम्बे रूग्णालयात (Bombay Hospital) आठवडाभरापूर्वी दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काही महिन्यांपूर्वी एनसीपी मध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंच्या एनसीपी प्रवेशानंतार मागील काही दिवसांपासून ते ईडी च्या रडार वर असल्याने चर्चेमध्ये आहेत. त्यांचे जावई गिरीश चौधरी देखील ईडीच्या ताब्यात आहेत. भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. तर जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. Eknath Khadse: भोसरी भूखंड प्रकरणात मला आणि कुटुंबीयांना ED द्वारे छळण्याचा प्रयत्न- एकनाथ खडसे.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांची 9 तास ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे. एकनाथ खडसेंनी या चौकशीनंतर ईडीला सहकार्य करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र ही कारवाई राजकीय हेतूने होत असल्याची खदखद एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली होती.