अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) द्वारा होत असलेल्या चौकशीवरच आपल्याला संशय आहे. हे चौकशीच राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा वास येत आहे. भोसरी येथील ज्या भूखंड खरेदी संदर्भात माझी चौकशी होत आहे. त्याचा आणि एमआयडीसीचा काहीच संबंध नाही. पाच वर्षांपूर्वी झालेला हा खरेदी व्यवराह आहे. तसेच, या व्यवहाराची पाच वेळा चौकशीही झाली आहे. असे असताना अजूनही ईडीला या प्रकरणाची चौकशी करावीशी वाटते. यावरुन एकनाथ खडसे (Eknath Khadse ) आणि त्यांच्या परीवाराला जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसे हे आज (8 जुलै) ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. त्या आधी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आज कुछ तो होनेवाला है' असे मेसेज जळगावमध्ये व्हायरल झाले आहेत. हे मेसेज जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची जी चौकशी सुरु आहे त्याला आम्ही सामोरे जाऊ. चौकशीनंतर बाहेर आल्यावर मी आपल्याला माहिती देईन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनथ खडसे यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द झाली आहे. प्रकृतीअस्वासथ्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स आले आहे. या समन्समध्ये त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल (7 जुलै) याबाबत माहिती देताना म्हटले होते की, एकनाथ खडसे हे उद्या पत्रकार परिषद घेतील आणि मग ईडी कार्यालयात चौकशीसाठी जातील. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त पुढे आले. त्यामुळे खडसे हे आता ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार का? याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी छोटासा संवाद साधत एकाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.
भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने काल (7 जुलै) अटक केली. त्यानंतर लगेच एकनाथ खडसे यांनाही समन्स बजावण्यात आला. बुधवारी (7 जुलै) सायंकाळी बजावलेल्या समन्समध्ये एकनाथ खडसे यांना आज (गुरुवार, 8 जुलै) चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. हे कार्यालय दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पीयर येथे आहे. (हेही वाचा, Eknath Khadse: एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अंमलबजावणी संचालनालय कडून अटक)
एएनआय ट्विट
I'll cooperate. Entire Maharashtra can see what is happening. Everyone knows this is politically motivated. Inquiry has already been done 5 times. It is being done again now. ACB has given a report that there is no evidence: NCP leader Eknath Khadse arrives at ED office in Mumbai pic.twitter.com/MWOkNEuAnT
— ANI (@ANI) July 8, 2021
एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी पत्रकारपरिष घेणार होते. या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषदेत के काय गौप्यस्फोट करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, त्यांची पत्रकार परिषदच रद्द झाली. त्यामुळे खडसे हे आता कधी गौप्यस्फोट करणार याबाबत उत्सुकता कायम आहे.