ED | File Image

महाराष्ट्रातील हायप्रोफाईल वकिलांपैकी एक सतिश उके (Advocate Satish Uke) सध्या ईडीच्या रडारवर आहेत. आज (31 मार्च) च्या सकाळपासूनच सतिश उके यांच्या घरावर ईडीने (ED) धाड टाकून झाडाझडती करायला सुरूवात केली आहे. दरम्यान ही छापेमारी कोणत्या प्रकरणातील आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. सतिश यांच्या नागपूरातील (Nagpur) घराबाहेर सीआरपीएफ पोलिसांचा (CRPF Police) मोठा आहे. दरम्यान जमीन व्यवहारामध्ये उकेंना क्राईम ब्रांच (Crime Branch) कडून नोटीस देण्यात आली होती त्यामुळे या प्रकरणाशी निगडीत ही ईडीची कारवाई असल्याचा अंदाज आहे.

सतिश उके यांनी अनेक बड्या प्रकरणांमध्ये कोर्टात युक्तिवाद केला आहे. सध्या महाराष्ट्रात चर्चा असलेलं फोन टॅपिंग प्रकरणामध्ये नाना पटोलेंच्या बाजूने सतिश उकेंनी बाजू लढवली होती. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील टीका केली होती.हे देखील नक्की वाचा: देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याच्या आरोपावरून चालणार खटला .

सतिश उकेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरूद्ध कोर्टातही याचिका दाखल केली होती. त्यामध्ये फडाणवीस यांच्यावर 2014 च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळेस सादर केलेल्या अ‍ॅफिडेव्हिट मध्ये 2 फौजदारी खटले लपवल्याचा आरोप केला होता. यामध्ये एक अब्रुनुकसानीचा तर एक फसवणूकीचा खटला आहे. फडणवीसांचे प्रतिज्ञापत्र खोटे असल्याने त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.