इक्बाल मिर्ची मनी लॉन्ड्रिंग (Iqbal Mirchi Money Laundering) प्रकरणातील वाधवान बंधूंचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने (ED) आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने असा दावा केला आहे की, जमीनाच्या नियमांचे कथित रुपात उल्लंघन केले आहे. तसेच कोरोना व्हायरसचे संकट पाहता लॉकडाउनचे नियम मोडून प्रवास सुद्धा केला आहे. प्रवर्तन निर्देशालयाच्या वकिल पूर्णिमा कंथारिया यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी.डी. नाईक यांच्या समोर याचिका दाखल केली आहे. तर कोर्टाने वाधवान यांना एक नोटीस पाठवली असून येत्या 23 एप्रिलला सुनावणी होणार आहे.गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्यासोबत वाटाघाटी केल्याप्रकरणी वाधवानला या वर्षात जानेवारी महिन्यात अटक करण्यात आल होती. तर इक्बाल मिर्ची याचा मृत्यू 2013 मध्येच झाला आहे. वाधवान यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण वाधवान याचा फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे
डीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली. वाधवान यांच्यावर इक्बाल मिर्चीशी संबंधित बनावट कंपन्यांना 2100 कोटींचे कर्ज दिल्याच्या आरोप आहे. वाधवान यांच्या 'डीएचएफएल'ने मिर्चीच्या मदतीने 2100 कोटी रुपयांच्या कर्जाद्वारे बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचा ईडीला संशय आहे.(महाराष्ट्र: वाधवान परिवाराने लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन केल्याने कुटुंबासह 23 जणांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल)
Enforcement Directorate (ED) moves Bombay High Court in order to cancel the bail of Wadhavan brothers in connection with the Iqbal Mirchi money laundering case. The matter will be heard on 23rd April. pic.twitter.com/tqYpU1kIMo
— ANI (@ANI) April 15, 2020
दरम्यान, गेल्याच आठवड्यात वाधनवान परिवार यांनी अन्य 23 जणांसोबत लॉकडाउनच्या काळात मुंबई ते महाबाळेश्वर प्रवास केला होता. यामुळे वाधवान परिवाराला क्वारंटाइन करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.