Iqbal Singh Chahal | File Photo

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) आज (18 मार्च) मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) सह अ‍ॅडिशनल कमिशनर अश्विनी भिडे, डेप्युटी कमिशनर पी वेलारासू यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना निवडणूकीच्या निगडीत कामाची जबाबदारी द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाकडून जे अधिकारी 3 वर्ष एकाच ठिकाणी आहेत किंवा जे स्वगृही जिल्ह्यात काम करत आहेत त्यांना तेथून हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इक्बाल सिंह चहल हे 1989च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी आहेत.

चहल हे ते चार वर्षे ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि चार वर्षे औरंगाबादचे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक होते. कोरोना काळात त्यांच्यावर मुंबईची जबाबदारी देण्यात आली. चहल यांच्या कामकाजाचा अनुभव कोविड काळात मुंबईकरांसाठी वरदान ठरला. त्यांच्या उपाययोजनांमुळे मुंबई कोविड काळात सावारण्यात मोठी मदत झाली. अनेक स्तरांतून त्यांच्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले होते.  नक्की वाचा: Mumbai: बीएमसी आयुक्त Iqbal Singh Chahal यांना 'मुंबई रत्न पुरस्कार'; राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान .

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे.