महाराष्ट्राला एकीकडे पावसाचा तडाखा बसत असताना पुण्याच्या (Pune) मुळशी तालुक्यामध्ये (Mulshi District) धरण भागात असलेल्या मौजे निंबाळवाडी ( आणि मौजे वडगाव वाघवाडी इथं भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहेत. या धक्क्यामुळे 500 मीटर जमिनही दुभंगल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान सध्या या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, मुळशी तालुक्यातील वाघवाडी मध्ये माळीण सारखे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे या भागात राहणार्या नागरिकांना इतरत्र हलवण्यात आले आहे. 12 जुलै पासून या भागात 500 मीटर लांब भेग पडली आहे. ही भेग पडल्याने टाटा तलावाकडील जमिन एक ते दीड फुटापर्यंत खाली गेल्याची माहिती समोर आली आहे.
मुळशी मध्ये जमीन खचण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. आतापर्यंत 12 ग्रामस्थांना हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण गटविकास अधिकारी संदिप जठार यांनी खचलेल्या जमीनीची आणि तेथील परिसराची देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.