March 2024 Hottest Month : युरोपियन युनियनच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एल निनो आणि मानवामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. त्यांच्या संयुक्त परिणामांमुळे मार्च 2024 हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना (Hottest Month)ठरला आहे. ज्याने तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. त्याशिवाय, कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (C3S) यांच्या म्हणण्यानुसार, तिथे मार्चमधील सरासरी तापमान 14.14 अंश सेल्सिअस होते. जे 1850-1900 पेक्षा सरासरी 1.68 अंश सेल्सिअस जास्त होते. (हेही वाचा : Heat-Related Deaths: उष्णतेमुळे 2050 पर्यंत होऊ शकतात 5 पट अधिक मृत्यू; 12 कोटी 70 लाख लोक ठरू शकतात उपासमारीचे बळी- Lancet Study)
गेल्या 12 महिन्यांचे सरासरी तापमानही जास्त
गेल्या 12 महिन्यांतील (एप्रिल 2023-मार्च 2024) तापमानाने जागतिक सरासरी तापमानापेक्षाही विक्रमी पातळी गाठली आहे. हे 1991-2020 च्या सरासरीपेक्षा 0.70 अंश सेल्सिअस आणि 1850-1900 च्या पूर्व-औद्योगिक सरासरीपेक्षा 1.58 अंश सेल्सिअस जास्त आहे.
हवामान बदलाच्या गंभीर परिणामांचा धोका
हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हवामान बदलाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी सर्व देशांनी जागतिक सरासरी तापमानात वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याची गरज आहे.
पृथ्वीचे तापमान वाढत आहे
1850-1900 च्या सरासरीच्या तुलनेत पृथ्वीच्या जागतिक पृष्ठभागाचे तापमान सुमारे 1.15 अंश सेल्सिअसने वाढले आहे, त्यामुळे दुष्काळ, जंगलातील आग आणि पुराचा सामना मानवाला करावा लागत आहे.
मिथेनची वाढ
वातावरणात प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेनची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक सरासरी तापमानात वाढ होत आहे.