पुण्याच्या ट्रॅफिकमधून प्रवास करणं हे दिवसेंदिवस कठीण होत आहे. रस्स्त्यावरील प्रायव्हेट गाडयांमुळे प्रदूषणाची पातळी देखील वाढत आहे. मात्र लवकरच पुणेकारांना प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यामध्ये आता नव्याने समाविष्ट होणाऱ्या आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बस यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे. 26 जानेवारीपासून या बस ताफ्यात सहभागी होणार आहेत.
कशा असतील इलेक्ट्रिक बस ?
पुण्याच्या ताफ्यात 25 इलेक्ट्रिकच्या बस लवकरच येणार आहेत.
बसमध्ये सुमारे 31 आसनक्षमतेच्या असतील.
साऱ्या बस वातानुकूलित असतील.
‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीला या बससाठीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. ही कंपनीनेच चार्जिंग आणि देखभालीची जबाबदारी घेणार आहे.
बस चार्जिंग साठी वीज पुरवठा पालिकेमार्फत केला जाईल.
सुरूवातीला ही बस निगडी ते भेकराईनगर या बीआरटी मार्गावर धावेल.
काय असेल तिकीट दर ?
बस वातानुकूलित असली तरीही दर नॉन एसी प्रमाणेच असतील.
पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक बस सेवा
इलेक्ट्रिक बसला दिवसा प्रति किमी 6 रुपये खर्च तर रात्री प्रति किमी 4.5 रुपये खर्च आहे. हा खर्च पालिका उचलणार आहे. सध्या सीएनजीवर चालणाऱ्या बससाठी 54 रुपये 7 पैसे प्रति किमी खर्च आहे. या बस नॉन एसी आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या बस प्रवासी आणि प्रशासन अशा दोन्हीसाठी फायदेशीर आहेत.
पुणेकरांचा प्रतिसाद पाहता भविष्यात अधिक बस ताफ्यात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.