Maharashtra Forest Department

Yavatmal News: यवतमाळ येथील वनरक्षक भरतीच्या अंतिम निवड परिक्षात चक्क डमी उमेदवार धावल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कदायक प्रकरामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 5 किलोमीटर धावण्याच्या चाचणी परिक्षेत डमी उमेदवार धावल्याचे समोर आले आहे. यवमाळमध्ये वन विभागाची भरती घेण्यात आली होती. 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोडी ही भरती घेण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला. (हेही वाचा- यूपीमध्ये सरकारी परीक्षेत बसले डमी उमेदवार)

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र सोमनथ पायगव्हाण असं मुळ उमेदवाराचे नाव आहे. तो छत्रपती संभाजी नगर येथीस पाळशी गावातील रहिवासी आहे. तर प्रदीप राजपूत असं डमी उमेदवाराचे नाव आहे. वन विभाच्याकडून परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी व्हिडिओ तपासले जात असे त्यात हा प्रकार उघडकीस झाला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, 5 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत चक्क दुसरा उमेरवार पळत असल्याचे अधिकाऱ्यांना दिसले. ही बाब गांभीर्याने बघत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. आणि उमेदवारावर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी डमी उमेदवाराला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली.त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  अंतिम टप्प्यात निवड यादी तयार करत असताना ही प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी रविंद्र आणि प्रदिप याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने यवताळमध्ये एकच खळबळ उडाली होती.