Dry Day (Photo Credits: File Photo)

Dry Days in Maharashtra: सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे महिन्यात राज्यात ड्राय डे घोषित करण्यात आले असून, त्यामध्ये दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य राखण्यासाठी  काही विशेष दिवसांमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जसे की, उद्या असणाऱ्या गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशात  ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे दारूविक्री बंद असणार आहे. दरम्यान, अजून कोणत्या दिवशी राज्यात दारूविक्री बंद असणार आहे. याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भारतात ऑक्टोबरमध्ये  ड्राय डे 

2 ऑक्टोबर, मंगळवार: गांधी जयंती

8 ऑक्टोबर, सोमवार: दारूबंदी सप्ताह (फक्त महाराष्ट्रात)

12 ऑक्टोबर, शनिवार: दसरा

17 ऑक्टोबर, गुरुवार: महर्षी वाल्मिकी जयंती

नोव्हेंबरमध्ये 3 दिवस

1 नोव्हेंबर, शुक्रवार: दिवाळी

12 नोव्हेंबर, मंगळवार: कार्तीची एकादशी

15 नोव्हेंबर, शुक्रवार: गुरु नानक जयंती

ड्राय डे  का जाहीर केला जातो?

राष्ट्रीय आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य राखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या विशेष दिवसांमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गांधी जयंती प्रमाणे, जेव्हा महात्मा गांधींच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात दारूची दुकाने बंद ठेवली जातात. याशिवाय दिवाळी, गुरु नानक जयंती  यासारख्या महत्त्वाच्या धार्मिक सणांच्या निमित्तानेही दारूविक्री बंद करण्याची तरतूद आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड

 आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांवर दंड आकारण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. या  दिवसात दारूविक्री बंद केल्याबद्दल परवानाधारकांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. लोक ज्या दिवशी विशेष धार्मिक आणि राष्ट्रीय प्रसंगी साजरे करतात त्या दिवसांचे पावित्र्य राखणे हा या आदेशाचा उद्देश आहे. अशाप्रकारे, हा आदेश प्रामुख्याने मद्यविक्रीवर लागू होतो