Drunken driver parks rickshaw in Mira Road station (PC - Twitter)

Mumbai: मद्यधुंद अवस्थेत एका ऑटोरिक्षा (Auto Rickshaw) चालकाने रिक्षा थेट मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या (Mira Road Station) आवारात नेली. लोकांनी सोशल मीडियावर तक्रार केल्यानंतर रेल्वे संरक्षण दलाने (RPF) चालकावर कारवाई केली. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी संतोष कुमार राठोड यांनी सांगितले की, चालकाने ऑटोरिक्षा प्लॅटफॉर्मवर नेली. प्रवाशांनी सोशल मीडियावर या घटनेची तक्रार केल्यानंतर आरपीएफने चालकावर कारवाई केली.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका फोटोमध्ये मीरा रोड स्टेशनवर तिकीट खिडक्यांसमोर ऑटो पार्क केलेला दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेसंदर्भात बोलताना सांगितले की, ऑटोरिक्षा चालक वाहन चालवत असताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत होते. चालकाच्या या कृत्यामुळे स्थानकातील सर्व प्रवासी आश्चर्यचकित झाली. (हेही वाचा - Female Leopard And Two Cubs Electrocuted: रानडुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या विद्यूत तारांच्या संपर्कात आल्याने मादी बिबट्या आणि 2 शावकांचा मृत्यू; चौघांना अटक)

दरम्यान, ड्रायव्हरने ऑटो 2-3 पायर्‍यांवर वळवला आणि ड्रायव्हर स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी आणखी 4-5 पायऱ्यांवर ही कृती पुन्हा करणार होता. मात्र, त्याला थांबवून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.