Female Leopard And Two Cubs Electrocuted: महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात रानडुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्याने मादी बिबट्या (Female Leopard) आणि दोन शावकांचा मृत्यू झाला. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील देवरी वन परिक्षेत्रात हवेत लटकत असलेल्या दुर्गंधीबद्दल एका व्यक्तीने वन अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या तपास मोहिमेत अधिकाऱ्यांना बिबट्याचे शव आणि दोन पिल्ले सापडले. अधिकार्यांना घटनास्थळी शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या विजेच्या ताराही आढळून आल्या.
एका गुप्त माहितीवर काम करत, वन अधिकाऱ्यांनी भोयरटोला आणि मेहताखेडा गावातील आठ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर विद्युत तारा लावणाऱ्या चार शिकाऱ्यांना अटक केली. सहाय्यक वनसंरक्षक जीएफ राठोड यांनी सांगितलं की, चौघांनी 26 ऑगस्टच्या रात्री रानडुकरांची शिकार करण्यासाठी जिवंत तारा टाकल्याची कबुली दिली. पण त्यामुळे बिबट्याचा आणि त्याचा दोन पिल्लांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Leopard Attack in Nashik Video: नाशिक मधील गुलमोहर कॉलनीत बिबट्याचा वावर, सीसीटीव्ही कॅमेरात कैद)
वनविभाकडून शवविच्छेदन आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहे. चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा आणि भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 जुलै रोजी महाराष्ट्रातील भंडारा येथे राष्ट्रीय महामार्ग 53 वर एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता.
दरम्यान, जून 2023 मध्ये, वन्यजीव SOS आणि महाराष्ट्र वन विभागाने ओतूर वन परिक्षेत्रातील निमगाव सावा गावात 30 फूट खोल विहिरीत अडकलेल्या नर बिबट्याची सुटका केली होती. विहिरीतून आलेल्या अनोळखी आवाजाने निमगाव सावा गावातील नागरिक सावध झाले. जवळून पाहणी केल्यावर त्यांना सुमारे 30 फूट खोल विहिरीत धडपडणारा बिबट्या दिसला. त्यानंतर नागरिकांनी तत्काळ यासंदर्भात महाराष्ट्र वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्याने बिबट्याला वाचवले.