Police (Pic Credit - Twitter)

एका काळ्या एसयूव्ही (SUV) चालकाच्या विरोधात मुंबईत (Mumbai) एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. कारण व्हायरल व्हिडिओ (Viral Video) क्लिपमध्ये त्याने वाहनाच्या बोनटवर (Bonnet) बसलेल्या ट्रॅफिक पोलिसांसह (Traffic police) गाडी चालवताना दिसला आहे. डीएन नगर (DN Nagar) पोलिसांनी सांगितले की त्याच्या गाडीवरच्या नंबरवरून त्यांनी आरोपीची ओळख पटवली आहे.  एफआयआरनुसार 48 वर्षीय ट्रॅफिक कॉन्स्टेबल विजयसिंह गुरव गुरुवारी अंधेरी पश्चिम येथील आझाद नगर मेट्रो स्टेशन अंतर्गत कर्तव्यावर होते. सकाळी 11 च्या सुमारास त्यांना एक काळी एसयूव्ही जेपी रोडवर चुकीच्या दिशेने जाताना दिसली. गुरव यांनी एसयूव्ही थांबवण्यासाठी मोटर चालकाकडे इशारा केला. मात्र वाहन चालकाने ओळखपत्र दाखवले आणि तो मीडियावाला असल्याचा दावा केला.

गुरव ज्या ठिकाणी वाहनाच्या बोनेटवर चढले त्या ठिकाणाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. गुरव यांनी गृहीत धरले की वाहन चालक शेवटी बाहेर पडेल. त्यानंतर ते त्याचे चालान करू शकतील. परंतु वाहनचालकाने अजूनही बोनेटवर बसलेल्या हवालदाराला घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने घटनेचा व्हिडिओ क्लिप शूट केली आहे.

वाहन चालकाने वाहन थांबवून पळ काढल्यानंतर हादरलेले गुरव बोनेटमधून खाली उतरले. त्यानंतर गुरव यांनी डीएन नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे चालकाचा माग काढला आहे आणि त्याला पकडले जाईल.

घाईघाईने वाहन चालवणे, जीव धोक्यात घालणे आणि सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्यात अडथळा आणणे. या प्रकरणी आयपीसी आणि मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींखाली नोंद करण्यात आली आहे. आयपीसीच्या कलम 353, 336, 279 आणि एमव्ही कायद्याच्या 184 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.