सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील काही दिवस पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये दाखल होते. न्यूमोनियाचे उपचार सुरू असतानाच त्यांना रक्ताच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. तापाने फणफणत असलेल्या प्रकाश आमटे यांना 13 जूनला बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात त्रास जाणवू लागल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले होते. आता न्युमोनियाचे इंफेक्शन कमी झाल्याची माहिती त्यांचा लेक अनिकेत आमटे यांनी फेसबूक द्वारा दिली आहे.
अनिकेत आमटे यांनी रूग्णालयातील प्रकाश आमटे यांचा फोटो देखील शेअर केला आहे. यावेळी प्रकाश आमटे नात रूमानी सोबत आहेत. अनिकेत यांनी पोस्ट मध्ये 'पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा.' असं लिहत फोटो पोस्ट केला आहे.
दरम्यान डॉ. प्रकाश आमटेंना ल्युकेमियाचे देखील निदान झाले आहे. त्यासाठी पुन्हा रक्ताच्या चाचण्या केल्या जातील. त्या रिपोर्ट्सवर पुण्यात पुढील उपचार सुरू होतील असे त्यांनी म्हटलं आहे. ब्लड व्हॅल्यूज ठीक असल्यास लवकरच म्हणजे 8-10 दिवसात किमो थेरपी सुरू होईल आणि पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे. हे देखील नक्की वाचा: Dr. Prakash Amte यांना Blood Cancer चं निदान; पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारांसाठी दाखल .
प्रकाश आमटेंच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती मिळताच अनेकांनी काळजी व्यक्त केली होती मात्र अनिकेत आमटे वेळोवेळी फेसबूकच्या माध्यमातून प्रकाश आमटेंच्या प्रकृतीचे अपडेट्स शेअर करत हॉस्पिटल मध्ये भेटायला न येण्याचं आवाहन करत आहेत.
अनिकेत आमटेंनी काल पोस्ट शेअर करत लोक बिरादरी आश्रमशाळा मधील दहावी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही अभिनंदन केले आहे. 'एकूण निकाल 83 टक्के लागला आहे. कॉपी मुक्त निकाल आहे. त्यामुळे ज्यांनी अभ्यास केला ती पास झालीत. सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता चांगला अभ्यास करून पुढील परीक्षेत यश संपादन करावे या साठी शुभेच्छा.' असे त्यांनी पोस्ट मध्ये लिहले आहे.