Dr. Prakash Amte यांना Blood Cancer चं निदान; पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारांसाठी दाखल
Dr.Prakash Amte | Facebook

महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) यांना Hairy Cell Leukemia या रक्ताच्या कॅन्सरच्या (Blood Cancer) एका प्रकाराने ग्रासलं आहे. असं वृत्त Free Press Journal कडून देण्यात आलं आहे. त्यांच्या वृत्तामध्ये देण्यात आलेल्या प्रकाश आमटेंच्या हेल्थ अपटेड मध्ये आमटे मागील दहा दिवसांपासून न्यूमोनिया इंफेक्शन (pneumonia Infection) मुळेदेखील तापाने फणफणत असल्याचं समोर आलं आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यात दीनानाथ रूग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.

Hairy Cell Leukemia काय असतो?

Hairy Cell Leukemia हा रक्ताचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. ज्यामध्ये तुमची Bone Marrow खूप जास्त बी पेशी (lymphocytes)बनवते. हा एक प्रकारचा पांढरा रक्त पेशी जो संसर्गाशी लढतो. या अतिरिक्त बी पेशी असामान्य आहेत आणि सूक्ष्मदर्शकाखाली "केसांसारख्या" दिसतात.

हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्प डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासोबत आमटे कुटुंबातील चौथी पीढी सांभाळत आहे. मागील 49 वर्ष हे काम अविरत सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा मध्ये लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी ते दवाखाना चालवतात. लोकांसोबतच ते जखमी प्राण्यांना सांभाळण्याचे, त्यावर उपचार करण्याचेही काम सुरू आहे. 2008 साली डॉ. प्रकाश आमटे यांना मॅगसेसे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. नक्की वाचा: अभिमानास्पद! डॉ. प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव!  

2007 साली प्रकाश आमटे यांचे वडील बाबा आमटे यांना देखील रक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले होते. त्या आजाराशी झुंजताना बाबा आमटे यांनी 9 फेब्रुवारी 2008 साली निधन झाले.