डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टर्सना पदव्युत्तर शिक्षण घेता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सुनावला निर्णय
Payal Tadvi Suicide Case (File Image)

नायर रुग्णालयातील महिला डॉक्टर पायल तडवी (Dr. Payal Tadvi) हिच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी पायल हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन डॉक्टर महिलांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मुंबई बाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. तर आता ताज्या अपडेट नुसार, मुंबई हायकोर्टाने तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रुग्णालयात जाता येणार नसल्याचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणी रुग्णालयाची भुमिका कोर्टाने ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती साधना जावध यांनी निर्णय दिला आहे.

पायल हिला जातीय शेरेबाजी करून आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी भक्ती मेहेर, डॉ हेमा अहुजा आणि डॉ अंकिता खंडेलवाल या तीन सिनियर डॉक्टर्संनी भाग पाडले होते. या प्रकरणाची अधिक चौकशी झाली असता या तिघींना अटक करण्यात आली होती. तर ऑगस्ट महिन्यात 9 तारखेला हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. तसेच दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. पण त्यावेळीच त्यांना नायर रुग्णालयात जाता येणार नाही अशी अट घातली होती. परंतु या महिला डॉक्टरांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी परवानगी देण्याचा अर्ज केला होता. पण हा अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. तसेच आरोपी डॉक्टरांचे परवाना निलंबनही न्यायालयाने रद्द केले आहे. (Payal Tadvi Suicide Case: नायर हॉस्पिटलमधील कथित रॅगिंग आणि आत्महत्या प्रकरणातीन तिन्ही सिनियर डॉक्टरांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीचं होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग)

ANI Tweet:

नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याचा आरोप रुग्णालयातील डॉक्टरांवर लावून पायलच्या कुटुंबाने नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी व या तीनही डॉक्टरांचे परवाने जप्त करावे अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती.