'राष्ट्रविरोधी, समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका' आयआयटी मुंबईकडून विद्यार्थ्यांना इशारा
JNU Student Protest | (Photo Credits: ANI)

नागरिकत्व दुरूस्ती कायदा (CAA) संपूर्ण भारतात लागू झाला आहे. देशातील अनेक राज्यातून या कायद्याला अजूनही विरोध दर्शवला जात आहे. यात मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातच आयआयटी मुंबई हॉस्टेलमध्ये (IIT Mumbai Hostel) राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. राष्ट्रविरोधी (Anti-National) आणि समाजविघातक (Anti-Social Activities) कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका, अशा इशारा आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना दिला आहे. स्टुडंट्स अफेयर्सचे असोसिएट्स डीन प्राध्यापक जॉर्ज मॅथ्यू यांनी नव्या 15 नियमांची नियमावली तयार केली आहे. हॉस्टेलच्या या नियमावलीत 'अँटी नॅशनल' शब्दाचा वापर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी देशभरात सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम जारी केले आहेत. आयआयटी मुंबईने मंगळवारी हे नवे नियम जारी केले आहेत. स्टुडंट्स अफेयर्सचे असोसिएट्स डीन प्राध्यापक जॉर्ज मॅथ्यू यांनी ही 15 नियमांची नियमावली जारी केली आहे. त्यातील दहाव्या नियमात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रविरोधी आणि समाजविघातक कृत्यांमध्ये भाग न घेण्याच्या सूचना दिल्या आहे. महत्वाचे म्हणजे, हॉस्टेलच्या या नियामावलीत अॅन्टी नॅशनल शब्दाचा वापर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार कॅम्पसच्या बाहेर व्यक्त करावेत, असे आयआयटी मुंबईचे संचालक सुभाष चौधरी चौधरी यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- तर सीएएचं समर्थन करणाऱ्या एका विद्यार्थ्याने राष्ट्रवाद आणि राष्ट्रविरोधी याला तुम्ही कसं परिभाषित करू शकता? जो लोक शर्जील इमामचं समर्थन करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत, असं सांगितलं.

विद्यार्थ्यांना लक्ष करण्यासाठी हे नवे नियम तयार करण्यात आल्याने आयआयटी मुंबईचे विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचे समर्थन करणाऱ्या एका विद्यार्थ्याने राष्ट्रवाद आणि राष्ट्रविरोधी याला तुम्ही कसे परिभाषित करू शकता? जो लोक शर्जील इमामचे समर्थन करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत, असे सांगितले.