Representational Image (Photo Credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

उद्या 25 मे पासून देशांतर्गत विमान (Domestic Flights)  सेवा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकारची (Maharashtra Government)  भूमिका अखेरीस स्पष्ट करण्यात आली आहे. मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी याबाबत माहिती दिली असून, यानुसार महाराष्ट्र सरकारने मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याला एका अटीवर परवानगी दिली आहे. उद्यापासून विमानसेवा सुरु होती मात्र दिवसाला प्रत्येकी केवळ 25 विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होईल असे सांगण्यात आले आहे. ही विमाानसंख्या हळूहळू वाढवण्यात सुद्धा येईल मात्र त्यासाठी सरकारला वेळ देण्यात यावा असे मलिक यांनी म्हंटले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार लवकरच आवश्यक ती नियमावली जाहीर करेल असेही मलिक यांनी सांगितले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केली नवी नियमावली; जाणून घ्या प्रवासादरम्यान कोणती खबरदारी घ्याल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांशी संवाद साधताना सुद्धा याबाबत संकेत दिले होते. आपण मुंबई येथून देशाअंतर्गत विमानसेवा सुरु करण्याबाबत विचार करत असल्या चे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले होते मात्र त्यासाठी सरकारला वेळ द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती, याबाबत नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशी सुद्धा ठाकरे यांनी संवाद साधला होता. यानंतर आता सरकारच्या वतीने नवाब मलिक यांनी विमानसेवा सुरु करण्याला हिरवा कंदील असल्याची घोषणा केली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र या निर्णयाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली होती. देशभरात 25 मे पासून विमानसेवा सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने सुद्धा परवानगी देणे हे धोक्याचं ठरेल, रेड झोन मधील विमानतळं सुरु करणं हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच सांगितले होते.