Representational Image (Photo Credits: File Photo)

मुंबईमध्ये मागील काही महिन्यात पूलांच्या स्थितीचं परीक्षण करून त्यामधील धोकादायक पूलांची स्थिती ओळखून यादी जाहीर करण्यात आली आहे. मे 2019 मध्ये आयआयटी बॉम्बे (IIT-B) ने केलेल्या ऑडीटमध्ये धोकादायक पूलांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा डोंबिवली रोड ओव्हर ब्रीज (Dombivli Road Overbridge) म्हणजेच  डोंबिवली-कोपर पूल आजपासून बंद होणार आहे. हेही वाचा- Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी

डोंबिबली कोपर पूल हा 39 वर्षीय जूना आहे. वाहतूकीसाठी धोकादायक असल्याने तात्काळ तो बंद करावा यासाठी केडीएमसीकडून वाहतूक विभागाला सांगण्यात आले. तसेच हे न केल्यास भविष्यातील संभावणार्‍या अपघाताची जबाबदारी स्वीकारा असेही केडीएमसी कमिशनर गोविंद बोडके यांनी सांगितले असल्याचे HT च्या वृत्तामध्ये नमुद करण्यात आले आहे. सार्‍याच प्रकारच्या वाहनांसाठी आता हा पूल बंद राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात जोशी पूल आणि फडके रोडवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

जुलै महिन्यापासूनच डोंबिवली कोपर पूलावर अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. मात्र पुडील महिन्यात 21 ऑगस्ट पासून हा पूल वाहतूकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला. अनेक डोंबिवलीकर ठाकुर्ली रोड ओव्हर ब्रीज जो डोंबिवलीपासून सुमारे 1.5 किमी अंतरावर आहे त्याचा वापर करतात. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, केडीएमसीकडून या भागात पूलाच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. अद्याप डोंबिवली-कोपर या पूलाच्या कामासाठी कोणतीही डेडलाईन ठरवण्यात आलेली नाही त्यामुळे हा पूल पुन्हा रहदारीसाठी कधी खुला होईल याची महिती नागरिकांना देण्यात आलेली नाही.