डोंबिवली MIDC येथील पेरोक्सि केम कंपनीत भीषण आग, जीवितहानी नाही
Fire | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

डोंबिवली (Dombivli) येथील एमआयडीसी (MIDC)  परिसरातील प्रसिद्ध क्लासिक हॉटेल (Classcic Hotel)  जवळ स्थित पेरोक्सि केम कंपनीत (Peroxi Chemical Company) आज, 9 सप्टेंबर  रोजी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याचे समजत आहे. या केमिकल कंपनीतील रिएकटरचा स्पोट झाल्याने एकाएकी संपूर्ण कंपनीने पेट घेतला .यामुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 2  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवणासाठी प्रयत्न सुरु आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त अद्याप हाती आले नसून या दुर्घटनेत अजून पर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.  (डोंबिवली मध्ये ऑरेंज पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट)

दरम्यान, एमआयडीसी परिसरात अनेक औद्योगिक व रासायनिक कारखाने प्रस्थापित आहेत, या कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे अगोदरच डोंबिवलीकरांना  प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो त्यात अशा घटनांमुळे आणखीनच भर पडत आहे . यापूर्वी जुलै मध्ये देखील या परिसरातील एका कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. परिणामी या एकंदरीतच प्रदूषणाचा अंदाज पावसाळ्यात येतो. आजही डोंबिवली परिसरात सकाळी नारंगी रंगच पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे, या दरवर्षीच्या त्रासामुळे डोंबिवलीकर नागरिक संतप्त आहेत.