Rammandir Dombivali (Photo credit- Twiiter)

Dombivli Crime:  डोंबिवलीत राममंदिरात रविवारी चोरी झाल्याची घटना घडली आहे.  डोंबिवली पूर्व भागात दावडी परिसरात श्रीराम मंदिरात मध्यरात्री ही घटना घडली. ही घटना मंदिरातील कॅमेरात कैद झाल्याने समोर आले आहे. चोरट्यानं मंदिरातील तीन मोठ्या दानपेटीतील पैसे चोरुन नेले आहे. या घटने प्रकरणी पोलीसांना कळवण्यात आले. मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  हा घटनेचे चित्र कॅमेरात कैद झाले असल्याने ट्विटर अकांउटला पोस्ट केले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार या मंदिरात पहिल्यांदाच चोरी झाले आहे. दावडी परिसरात 1986 साली उभारण्यात आलेले हे राम मंदिर आहे. रविवारी या मंदिराची चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंदिराचे व्यवस्थापक हरिशंकर पांड्ये यांनी ताबडतोब मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपीवर पोलीसानी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोरट्यांने रात्रीच्या सुमारास मंदिरातील लोखंडी जाळीच्या गॅप मधून मंदिरात प्रवेश करत ही चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरी करतानाचे चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. चोरट्यांने मंदिरातील पैसे चोरले. तीन दानपेटीचे कुलुप तोडून त्यातील रोख रक्कम 15 हजारच्या आसपास चोरले. रात्री 12:30 च्या आसपास ही चोरी करण्यात आली आहे.  दावडी परिसरात या घटनेमुळे भाविकांचे मन दुखावल्याचे मंदिराचे व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.