Dombivli Crime: डोंबिवलीत महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक, पुढील तपास सुरु
Arrest (PC -Pixabay)

Dombivli Crime: डोंबिवलीत गुन्हेगारींचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान डोंबिवली (Dombivali) महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. पोलिसांनी (Police) या हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.  हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण ? याचा तपास पोलिस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली महापालिकेचे कर्मचारीसह वाहनचालक विनोद लंकेश्री याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या घटनेअंतर्गत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. हे चारही आरोपी घाटकोपरमधील असून व्यवसायाने रिक्षाचालक असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. कमरुद्दीन शेख, अरबाज सय्यद, इस्त्राईल शहा आणि शाहरुख शेख अशी या आरोपींची नावे आहे. हल्ले का केला आणि कोणी केला याचा तपास रामनगर पोलिसांकडून सुरु आहे. (हेही वाचा-Mumbai Local मध्ये तरूणावर ब्लेड हल्ला; ठाणे-कळवा स्थानकादरम्यानची घटना)

घटना केव्हा घडली

नोव्हेंबरच्या २७ तारखेला रात्री ८वाजून ४० मिनिटांनी वाहनचालक विनोद लंकेश्री यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. हे पाहचाच रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला आरोपीला पकडण्याच्या प्रयत्न केला पण तो काही हाती लागला नाही. पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. आणि पीडित विनोद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्ले मागिल हेतू असष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद लंकेश्री हे महानगरपालिकेच्या ग्रुप डी म्हणून वाहनचालक आहे. यांच्यालक हल्ला करणाऱ्या आरोपींवर रामनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हेगारांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे परंतु या हल्लेमागील मुख्य हेतू काय? याचा शोध पोलिस घेत आहे.