डोंबिवली: मधुबन सिनेमागृहाच्या बाल्कनीचा भाग चित्रपटादरम्यान कोसळला, 2 जण जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

डोंबिवली (Dombivli)  मधील मधुबन सिनेमागृहाच्या बाल्कनीचा भाग चित्रपट सुरु असताना कोसलळ्याची घटना घडली आहे. यामध्ये 2 महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

विष्णुनगर परिसरातील मंगल धाम सोसायटीमधील काहीजण रविवारी संध्याकाळी मिशन मंगल हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान चित्रपट संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर बाल्कनीचा काही भाग खाली कोसळला. यामध्ये दोघी महिला जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये एक महिला आणि लहान मुलीचा समावेश आहे. तर जखमी झालेल्या दोघींवर नजीकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.(धुळे: औरंगाबाद - शहादा एसटी बसला भीषण अपघात; 13 ठार)

परंतु बाल्कनीचा भाग कोसळल्याच्या प्रकारानंतर चक्क पोलिसांना याबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांच्या अशा वागण्यामुळे आणि महापालिकेच्या कार्यावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.