धुळे:  औरंगाबाद - शहादा एसटी बसला भीषण अपघात; 13 ठार
Dhule Bus Accident(Photo Credits: Twitter/ ANI)

महाराष्ट्रातील औरंगाबाद - शहादा (Aurangabad to Shahada) एसटी बसला अपघात झाला आहे. धुळ्याजवळील निमगुळ गावाजवळ ( Nimgul village) हा अपघात झाला असून यामध्ये 10 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. कंटेनर बस आणि एसटीमध्ये समोरासमोर धडक झाल्याने एसटी बसच्या निम्म्या भागाचा चक्काचूर झाला आहे. काल (18 ऑगस्ट) च्या रात्री हा भीषण अपघात झाला आहे.

औरंगाबाद - शहादा या बसमध्ये 44 प्रवासी होते. या अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्यांच्या मदतीला स्थानिक ग्रामस्थ धावून आले आहे. सध्या जखमींवर स्थानिक प्रशासनाच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ANI Tweet

बस अपघात इतका भीषण होता की एसटीमध्ये कंटेनरचा भाग घुसला होता. कंटेनरचा घुसलेला भाग काढण्यासाठी पत्रा कापून बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढल्याचे प्रयत्न सुरू आहेत. बस अपघाताची माहिती समजताच प्रशासन घटनास्थळी पोहचले आहेत.