प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

मुंबई : भाईंदर मच्छी मार्केट (Bhayander Fish Market) मध्ये विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या माश्यांमध्ये गुरुवारी 25 एप्रिलला अचानक एक डॉल्फिन (Dolphin) मासा आढळून आला त्यानंतर काहीच वेळात हा पाच फूट ठाणे जलचर घोडबंदर रोड (Ghodbunder) जवळच्या एका जंगलात पुरलेला दिसून आला. ठाणे परिसरातील काही अल्पवयीन मुलांनी या डॉल्फिन सोबतचा काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. हा डॉल्फिन नजरचुकीने मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मुलांनी काढलेला फोटो व्हायरल होताच लगतच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांनी याची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. हा डॉल्फिन मच्छिमारांच्या जाळ्यात सापडला असणार त्यानंतर फरक न जाणवल्याने हा नेहमीचाच कोणता मासा असल्याची गल्लत करून या मच्छिमारांनी त्याला भाईंदरच्या बाजारात विक्रीसाठी नेले असेल मात्र हा मासा डॉल्फिन असल्याचे कळल्यावर घाबरून त्यांनीच त्याला जंगलात पुरले असू शकते असे संबंधित वन अधिकाऱ्यांनी टाइम्सच्या वृत्तात म्हंटले आहे. गजब! हॉटेलमध्ये जेवताना व्यक्तीच्या तोंडातून निघाला 2.50 लाख रुपयांचा मोती

या घटनेचा सुगावा लागल्यावर फोटो शेअर केलेल्या मुलांसोबत जंगलात जाऊन वन अधिकाऱ्यांनी मृत डॉल्फिनच्या बॉडीचा शोध घेतला यावेळी डॉल्फिनच्या शरीरावर कोणत्याही जखमा झालेल्या आढळल्या नाहीत,' अशी माहिती ठाणे एसपीसीएच्या डॉ. नेहा शाह यांनी दिली. या संबंधी कोणालाही संशयी धरले नसून मृत डॉल्फिनचे फोटो काढणाऱ्या मुलांकडे चौकशी करण्यात येईल असे वनाधिकारी जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.