नितीन गडकरी (Photo credit:PTI/File Image)

राहुरी कृषी विद्यापीठाच्या (Rahuri Agricultural University) पदवीदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती ठीक असल्याचे वृत्त समोर आले.  पण आता मात्र खुद्द गडकरींनी ट्विट करत या बातमीला दुजोरा दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना व्यासपीठावर भोवळ; राज्यपालांनी सावरले, उपचार सुरु

गडकरींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने चक्कर आली होती. त्यानंतर मी डॉक्टरांचे उपचार घेतले आहेत आणि आता मी पूर्णपणे ठीक आहे. सर्व हितचिंतकांचे आभार."

पदवीदान समारंभात राष्ट्रगीत सुरु असताना नितीन गडकरी यांना चक्कर आली. मात्र शेजारीच उपस्थित असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव (Maharashtra Governor C Vidyasagar Rao) यांनी त्यांना सावरले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.