Diwali Wishes: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय नेत्यांकडून दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

कोरोना (Corona) महामारीनंतर म्हणजेच तब्बल दोन वर्षांनंतर आपण यावर्षी सारे उत्सव सण समारंभ धुमधडाक्यात साजरे करत आहोत. गणेशोत्सव (Ganeshotsav), नवरात्री (Navratri) उत्सव, दसरा अगदी दणक्यात पार पडले. आज लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळसणाच्या पाच दिवसांपैकी सर्वात महत्वाचा दिवस. हिंदू संस्कृतीत दिवाळी हा मोठा सण. प्रभु श्रीरामाने आजच्या दिवशी वनवास संपवून तसेच रावणावर मात करु अयोध्येत परतले होते (Lord Ram) म्हणून या दिवसाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्व आहे. प्रभू श्रीराम आजच्या दिवशी अयोध्येत परतल्याच्या आनंदात संपूर्ण अयोध्येत दिवे लावत श्रीरामांचे स्वागत करण्यात आले होते. म्हणून दिवाळीच्या दिवसात दिवे लावत चौबाजू रोषणाई करत आजचा दिवस साजरा करण्यात येतो. अनेक उत्सह साजरा करणारा हा दिवस संपूर्ण भारत भऱ्यात धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. तरी पारंपारिक रीतीने तुम्ही तुमच्या मित्रपरीवात, नातेवाईकांत कुटुंबासह हा सण साजरा करण्याची, शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. तरी देशातील विविध राजकीय मंडळींकडून दिवाळीच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी स्वत:च्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर (Twitter) ट्वीट करत म्हणाले,  प्रकाशाचा हा सण तुमच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेवून येवो अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या आहे.

 

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनेतेच्या सर्व इच्छा पूर्ण होवो, असं ट्वीट करत महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील देशवासियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत. अंधकारावर प्रकाशाचा, अधर्मावर धर्माचा विजय होवो अशा आसयाचं ट्वीट करत राहुल गांधींनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

दीपावळीचे हे मंगल पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृध्दीचा प्रकाश घेऊन येवो, लक्ष्मीपूजनाच्या हार्दीक शुभेच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

 

आपल्या जीवनात यश, कीर्ती, सुख-समृद्धीची भरभराट होवो ही शुभकामना राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.